Covid 19: महाराष्ट्रात 2620 नव्या रूग्णांचं निदान, 59 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के
Covid 19: महाराष्ट्रात 2620 नव्या रूग्णांचं निदान, 59 मृत्यूंची नोंद
ADSC

महाराष्ट्रात आज दिवसभरात 2620 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 59 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. तर राज्यात आज दिवसभरात 2943 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 97 हजार 18 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.32 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 99 लाख 44 हजार 679 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 73 हजार 92 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 972 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1050 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 33 हजार 11 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 2620 रूग्णांचं निदान झालं आहे त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 65 लाख 73 हजार 92 इतकी झाली आहे.

कोव्हिड
कोव्हिड प्रातिनिधिक फोटो

1 हजारपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई- 5941

ठाणे- 4217

रायगड- 1482

पुणे-8653

सातारा-2005

अहमदनगर-3443

सोलापूर-1279

एक हजारापेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्या जिल्ह्यांची संख्या पाहिली तर लक्षात येतं की पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्यानंतर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आहेत.

Covid 19: महाराष्ट्रात 2620 नव्या रूग्णांचं निदान, 59 मृत्यूंची नोंद
लसीकरणाचा कोल्हापुरी पॅटर्न! विशेष मोहिमेत 122 महिलांचं लसीकरण, लकी ड्रॉमधून मिळणार बक्षीसं

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आज राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मिशन कवच कुंडल या नवीन मोहिमेची घोषणाही केली. या मोहिमच्या अंतर्गत राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कुठेही लसींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आङे. 8 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात रोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे सध्या एक कोटी लसी उपलब्ध आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरणाबाबत काय म्हणाले काय म्हणाले राजेश टोपे?

आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरून आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. लसीकरण हाच आता मोठा पर्याय आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in