Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 2681 नव्या रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 2681 नव्या रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्या

महाराष्ट्रात 2681 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत, तर 2413 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 94 हजार 75 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट अर्थात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.32 टक्के इतकं झालं आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 97 लाख 66 हजार 957 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 70 हजार 472 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 39 हजार 587 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1328 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 33 हजार 397 सक्रिय रूग्ण आहेत.

कोरोना
कोरोना Photo- India Today

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आज राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोना रुग्णसंख्या
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्श घेतलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मिशन कवच कुंडल या नवीन मोहिमेची घोषणाही केली. या मोहिमच्या अंतर्गत राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कुठेही लसींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आङे. 8 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात रोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे सध्या एक कोटी लसी उपलब्ध आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरणाबाबत काय म्हणाले काय म्हणाले राजेश टोपे?

आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरून आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. लसीकरण हाच आता मोठा पर्याय आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.