Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 46 हजार 723 नव्या रूग्णांचं निदान, ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 86 नवे रूग्ण

महाराष्ट्रात दिवसभरात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात कोरोनाचे दिवसभरात 46 हजार 723 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.1 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 28 हजार 41 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 66 लाख 49 हजार 111 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के इतकं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 11 लाख 42 हजार 569 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 70 लाख 34 हजार 661 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 86 रूग्ण

आज राज्यात ओमिक्रॉनच्या 86 रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 25 राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, 30 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 31 रूग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत.

असा आहे रूग्णांचा तपशील

पुणे मनपा-53

मुंबई-21

पिंपरी-6

सातारा-3

नाशिक-2

पुणे ग्रामीण-1

आजपर्यंत राज्यात एकूण ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या 1367 विषाणू बाधित रूग्ण रिपोर्ट झाले आहेत.

मुंबई-627

पुणे मनपा-329

पिंपरी-75

सांगली-59

नागपूर-51

ठाणे-48

पुणे ग्रामीण-41

कोल्हापूर-18

पनवेल-18

सातारा-13

उस्मानाबाद-11

नवी मुंबई-10

अमरावती-9

कल्याण डोंबिवली-7

बुलढाणा-6

वसई विरार-6

भिवंडी-5

अकोला-5

नांदेड-3

उल्हासनगर-3

औरंगाबाद-3

गोंदिया-3

अहमदनगर-2

गडचिरोली-2

लातूर-2

नंदुरबार-2

नाशिक-2

सोलापूर-2

जालना-1

रायगड-1

एकूण- 1367

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या
कोव्हिड संसर्ग झाला आहे पण लक्षणं दिसत नाहीत? सरकारने दिल्या 'या' मार्गदर्शक सूचना

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी 734 त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 4259 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 77 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

महाराष्ट्रात आज घडीला 2 लाख 40 हजार 122 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 46 हजार 723 नवे रूग्ण आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 70 लाख 34 हजार 661 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in