Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 699 कोरोना रूग्णांचं निदान, 19 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 699 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात 1087 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 88 हजार 680 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.72 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 62 लाख 55 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 39 हजार 995 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 77 हजार 642 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 896 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज राज्यात ओमिक्रॉन संसर्गाचा एकही रूग्ण आढळलेला नाही. महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाचे दहा रूग्ण आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
राज्यात आज घडीला 6445 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 699 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 39 हजार 995 इतकी झाली आहे.
ओमिक्रॉनचे महाराष्ट्रात दहा रूग्ण
ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दहा रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कल्याण डोंबिवलीत पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे-पिंपरीत सात रूग्ण आढळले तर आजच मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत.

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?
WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.
पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.
याशिवाय काही खास गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात. मास्क घालणं आणि शारीरिक अंतर ठेवणं. घर किंवा ऑफिसमध्ये पुरेसं व्हेंटिलेशन असणं महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग हा हात धुवून देखील टाळता येऊ शकतो. व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी, अलीकडे संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे आवश्यक आहे.
कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन आपल्याकडे आरोग्य सेवा प्रणालींकडे पुरेशी संसाधने आहेत याची खात्री करा. याव्यतिरिक्त, आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ओमिक्रॉन किंवा स्प्रेडिंग व्हेरियंटशी संबंधित योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.