Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 766 नव्या रूग्णांचं निदान, 19 मृत्यूंची नोंद

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के इतकं झालं आहे.
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 766 नव्या रूग्णांचं निदान, 19 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात दिवसभरात 766 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे तर 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात 929 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 64 लाख 77 हजार 379 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के इतकं झालं आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 48 लाख 44 हजार 896 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 31 हजार 297 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या महाराष्ट्रात 85 हजार 335 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1077 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 9493 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 766 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 31 हजार 297 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आढळलेले रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in