Covid 19 : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 782 नव्या रूग्णांचं निदान, 14 मृत्यूंची नोंद

Covid 19 Cases: महाराष्ट्रात दिवसभरात 782 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
covid 19 782 new patients diagnosed in maharashtra 14 deaths recorded
covid 19 782 new patients diagnosed in maharashtra 14 deaths recorded(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात 782 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 14 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 770 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 86 हजार 105 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.71 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 6 कोटी 59 लाख 63 हजार 184 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 38 हजार 071 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 79 हजार 460 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 914 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात आज घडीला 7129 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 782 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 38 हजार 071 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री

दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता देशात कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉनची एंट्री झाली आहे. ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अशातच ओमिक्रॉनचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने महाराष्ट्र सरकारची चिंता आता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी द. अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. हा नव्या व्हेरिएंटचा राज्यातील पहिलाच रुग्ण असल्याचे समजते आहे.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

covid 19 782 new patients diagnosed in maharashtra 14 deaths recorded
Covid-19: ..तर Omicron मुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते: राजेश टोपे

ओमिक्रॉन व्हेरियंट आणि करण्यात येणारी कार्यवाही -

दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोव्हिड 19 विषाणूच्या व्हेरियंटला ओमिक्रॉन असे नाव दिले आहे. हा व्हेरिअंट 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' असल्याचे नमूद केले आहे. विषाणू मधील या जनुकीय बदलामुळे त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलांमुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढल्याचे सध्या दिसत असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का किंवा हा नवा विषाणू प्रतिकार शक्ती भेदून संसर्ग करू शकेल का? याबाबत आताच निश्चित भाष्य करणे कठीण असले तरी येत्या दोन आठवड्यात या बदल अधिक माहिती मिळू शकेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in