Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 854 नवीन रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनचे तब्बल 8 नवे रुग्ण

Covid 19 Update: महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.71 टक्के इतका झाला आहे.
maharashtra leaders angry over desecration of shivaji maharaj statue what are the reactions of state leaders
maharashtra leaders angry over desecration of shivaji maharaj statue what are the reactions of state leaders(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात आज (18 डिसेंबर) दिवसभरात 854 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. तर 11 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात 804 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 64 लाख 96 हजार 733 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.71 टक्के झाला आहे.

आज राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तब्बल 8 नवे रूग्ण सापडले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 75 लाख 70 हजार 939 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 48 हजार 694 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 80 हजार 039 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दिवसभरात राज्यात सापडले तब्बल 8 ओमिक्रॉन रूग्ण

आज राज्यात तब्बल 8 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 3 रुग्ण सातारा आणि 1 रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण 48 ओमिक्रॉन रुग्ण सापडले आहेत. (मुंबई-18, पिंपरी-चिंचवड- 10, पुणे ग्रामीण- 6, पुणे मनपा- 3, सातारा- 3, कल्याण-डोंबिवली - 2, उस्मानाबाद - 2, बुलढाणा - 1, नागपूर - 1, लातूर - 1, वसई-विरार -1)

यापैकी 28 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

maharashtra leaders angry over desecration of shivaji maharaj statue what are the reactions of state leaders
Covid-19 : नवी मुंबईतील शाळेत कोरोनाचा उद्रेक! 16 विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?

WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.

पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in