Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 877 नवीन रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनच्या एकाही रूग्णाची आज नोंद नाही

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

महाराष्ट्रात आज दिवसभरात 877 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे, 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 632 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 64 लाख 95 हजार 249 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के झाला आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

आज राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एकाही रूग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 73 लाख 6 हजार 860 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 46 हजार 938 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 77 हजार 371 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 839 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
Omicron: ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक,डेल्टापेक्षा 70 पट वेगाने संक्रमण: स्टडी

आज एकही ओमिक्रॉन रूग्ण नाही

आज राज्यात एकही नवीन ओमिक्रॉन रुग्ण रिपोर्ट झालेला नाही.

आजपर्यंत राज्यात एकूण 32 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत (मुंबई – 13, पिंपरी चिंचवड -10, पुणे मनपा -2, कल्याण डोंबिवली – 1 नागपूर -1 ,लातूर -1 वसई विरार -1, उस्मानाबाद -2 आणि बुलढाणा-1 ).

यापैकी 25 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो आहे-WHO प्रमुख

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?

WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.

पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in