Covid 19 : राज्यात दिवसभरात 960 नव्या रूग्णांचं निदान, 41 मृत्यूंची नोंद

Covid 19 : राज्यात दिवसभरात 960 नव्या रूग्णांचं निदान, 41 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 960 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 41 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 1043 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.68 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 32 हजार 257 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 84 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1084 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 9 हजार 366 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 960 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 32 हजार 257 इतकी झाली आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोव्हिड सेंटरमध्ये दोन बोगस कोरोना रूग्ण दाखल, औरंगाबादमधला धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आढळलेले रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

युरोपमध्ये कोरोनाचा कहर

युरोपमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे, कारण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे हा व्हायरस वेगाने पसरला आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढला आहे. यानंतर WHO ने कोरोना व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून युरोपमध्ये 7 लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा देत भीती व्यक्त केली आहे. युरोपातल्या 53 देशांमध्ये सात लाख मृत्यू होऊ शकतात असं WHO ने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in