Covid 19 : महाराष्ट्रात 999 नव्या रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात 999 नव्या रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्ण (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 999 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 1020 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 66 हजार 913 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा दर इतकाच आहे. ही बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 6 कोटी 38 लाख 63 हजार 284 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 23 हजार 344 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 1 लाख 19 हजार 432 रूग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर 1028 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 12 हजार 219 सक्रिय रूग्ण आहेत.

(फोटो सौजन्य - PTI)

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

 कोरोना रुग्ण
शून्य कोरोना मृत्यूचं मुंबई मॉडेल काय आहे?

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in