Covid 19: 'कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक'

Covid 19 Booster shots: कोरोना व्हायरसला रोखायचं असेल तर त्यासाठी तिसऱ्या डोसची म्हणजे बूस्टर डोसची गरज असल्याचं अमेरिकेतील एका वरिष्ठ तज्ज्ञाने सांगितलं आहे.
Covid 19: 'कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी  बूस्टर डोस आवश्यक'
Covid 19: The biggest US expert claims that booster shots are needed to defeat the corona virus(प्रातिनिधिक फोटो)

वॉश्गिंटन: बदलत्या परिस्थितीनुसार, कोव्हिड-19 या व्हायरसपासून जास्तीत जास्त संरक्षण मिळवण्यासाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस लोकांना आवश्यक असेल, असा दावा अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची (Anthony Fauci) यांनी केला आहे.

याबाबत ते म्हणाले, 'फायझरने (Pfizer) युनायटेड स्टेट्स एफडीएला 52 पानांच्या सादरीकरणात प्रस्ताव दिला, ज्यामध्ये अलीकडेच इस्त्रायलमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेच्या डेटाचाही समावेश आहे. ज्यामध्ये असे दर्शविले गेले आहे की, कोविड लसीचा बूस्टर डोस हा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये संसर्ग आणि गंभीर आजार दोन्ही रोखू शकतो.'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनानेही त्याला पाठिंबा दिला आहे. तथापि, पॅनेलने 65 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी फायझरच्या कोव्हिड लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शियस डिजीज या संस्थेचे संचालक अँथनी फाउची यांनी टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, 'माझं असं म्हणणं आहे की, असं समजतंय की, योग्य आहार, कमीत कमी एक mRNA लस जसी की फायजरसाठी दोन मूलभूत डोस आहेत. ज्यामध्ये तीन ते चार आठवड्यात एक बूस्टर दिला जातो. त्यानंतर अनेक महिन्यांनी तिसरा बूस्टर डोस दिला जातो.'

संक्रमणाचा दर कमी

अँथनी फाउची म्हणाले, "मी रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याच्या आधारावर बूस्टर डोस देण्याचे समर्थन करतो.'

ते म्हणाले, 'इंग्लंडमध्ये संसर्गात घट होण्याची काही चिन्हे आहेत. म्हणूनच 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक, तसेच आरोग्य सेवा पुरवणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांचे लवकरच लसीकरण केले जाईल.'

Covid 19: The biggest US expert claims that booster shots are needed to defeat the corona virus
Corona vaccine: एक व दोन्ही डोस घेतलेल्यांना मृत्यू ओढवण्याचा धोका किती?; केंद्राने दिली माहिती

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या फायझर अभ्यासात असे दिसून आले आहे की, बूस्टर डोसच्या सुमारे 12 दिवसानंतर संसर्गाचा दर 11 पट कमी होतो. तसेच ज्यांनी दोन डोसच्या तुलनेत बूस्टर डोस घेतला आहे त्यांच्यामध्ये गंभीर आजारांचा दर 20 पट कमी होतो.

त्याचप्रमाणे, मॉडर्नाने (Moderna) असाही दावा केला आहे की, कोव्हिड-19 विरूद्ध त्यांच्या mRNA लसीपासून केवळ सहा महिने संरक्षण होऊ शकतं, जे बूस्टर डोससाठी एक मजबूत कारण आहे. दुसरीकडे इस्त्रायल, यूएई, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीसारख्यांनी अनेक देशांनी आधीच बूस्टर डोससाठी पावलं उचलली आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in