Covid 19 : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 3671 रूग्णांची नोंद

Covid 19 : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 3671 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाने कहर केला आहे असंच चित्र आहे. कारण मुंबईत कोरोनाचे 3671 रूग्ण गेल्या चोवीस तासात आढळले आहेत. मुंबईत आज दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आज दिवसभरात 371 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 46337 रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातले 3671 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

29 डिसेंबर-2510 रूग्णांची नोंद

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

21 ते 29 डिसेंबर या कालावधीत रूग्णसंख्या 327 वरून 2510 वर गेली आहे. तर आज दिवसभरात 3671 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आली आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 88 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Covid 19 : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 3671 रूग्णांची नोंद
Omicron Variant: 'पुढील महिना सर्वात धोकादायक', ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार ते पाच दिवसात पाच इमारती सील केल्या आहेत. दूतावास अपार्टमेंटची बी विंग आणि नेपेनसी रोड येथील दर्या महलची ए विंग सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये आहेत. दूतावास अपार्टमेंटमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यापैकी 11 प्रकरणे बी विंगमधून आणि उर्वरित ए विंगमधून नोंदवली गेली आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इमारती सील केल्या जात आहेत. मंगळवारी दूतावास अपार्टमेंटमध्ये 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर संपूर्ण इमारतीत चाचणी घेण्यात आली आणि आणखी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

देशात ओमिक्रॉनचे 961 रूग्ण

देशात आत्तापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 961 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आङेत. त्यातले 320 रूग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी दिल्लीत ओमिक्रॉनचे 263 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 57 जण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत 252 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ओमिक्रॉनचे गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, केरळमध्ये 65, तेलंगणामध्ये 62, तामिळनाडूत 45, कर्नाटकमध्ये 34, आंध्रप्रदेश 16, हरयाणा 12, बंगाल 11, मध्यप्रदेश 9, ओदिशामध्ये 9, उत्तराखंडमध्ये 4, छत्तीसगढ 3, जम्मू काश्मीरमध्ये 3, उत्तर प्रदेशात 2, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, मणिपूर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in