Covid 19 : महाराष्ट्रात 1418 नवीन रूग्णांचं निदान, 36 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी (फाइल फोटो)

Covid 19 : महाराष्ट्रात 1418 नवीन रूग्णांचं निदान, 36 मृत्यूंची नोंद

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 54 टक्के इतके झाले आहे

महाराष्ट्रात दिवसभरात 1418 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 36 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 2112 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 45 हजार 454 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 54 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 23 लाख 16 हजार 910 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 7 हजार 954 नमुने आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 71 हजार 200 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 896 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात आज घडीला 18 हजार 748 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 1418 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 7 हजार 954 झाली आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्राचा 27 ऑक्टोबरचा कोव्हिड रिपोर्ट काय सांगतो आहे?

देशात कोरोना रूग्णांची एकूण संख्या-3 कोटी 42 लाख, 2 हजार 202

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या- 66 लाख 5 हजार 51

देशातील बरे झालेल्या कोरोनाची रूग्णांची एकूण संख्या- 3 कोटी 35 लाख 83 हजार 318

महाराष्ट्रातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या- 64 लाख 38 हजार 395

देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण- 98.19 टक्के

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट- 97.48 टक्के

देशात झालेले एकूण मृत्यू- 4 लाख 55 हजार 68

महाराष्ट्रात झालेले एकूण मृत्यू- 1 लाख 40 हजार 60

देशाचा मृत्यू दर - 1.34 टक्के

महाराष्ट्राचा मृत्यू दर- 2.12 टक्के

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

कोरोनाचा वेगळा व्हेरिएंट

महाराष्ट्र एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरतो आहे. अशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली का असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण कोरोनाचा नवा व्हेरिएंट आता आढळला आहे. या व्हेरिएंटचं नाव Delta AY 4.2 असं आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटचे काही रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

ब्रिटनपाठोपाठ आता डेल्टा व्हेरिएंटच्या नव्या प्रकारतले रूग्ण भारतातही आढळले आहेत. हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही घातक आहे. मात्र याचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) हा अहवाल जाहीर केला आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या नवीन म्युटंटची रुग्ण इंदूरमध्ये आढळली आहेत. जो डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक आहे. यापैकी दोन रुग्ण हे महू छावणीत तैनात असलेले लष्करी अधिकारी आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली.

महाराष्ट्रात बुधवारपासून दिवाळी संपेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीमही सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं लसीकरण यामधून केलं जाणार आहे. एवढंच नाही तर २८ ऑक्टोबरपासून १०० टक्के क्षमतेने पश्चिम आणि मध्य रेल्वेही चालवली जाणार आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in