Covid 19 : महाराष्ट्रात 833 कोरोना रूग्णांचं निदान, 15 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे...AajTak

Covid 19 : महाराष्ट्रात 833 कोरोना रूग्णांचं निदान, 15 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 833 कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 2271 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 74 हजार 952 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.67 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 6 कोटी 45 लाख 94 हजार 210 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 29 लाख 577 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 693 होम क्वारंटाईन आहेत तर 1002 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 10 हजार 249 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 833 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 66 लाख 29 हजार 577 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी
महाराष्ट्रातील कोरोना चाचणी (फोटो सौजन्य - India Today)

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आढळलेले रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in