Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 852 नव्या रूग्णांचं निदान, 34 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतका झाला आहे
कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात दिवसभरात 852 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. जो गेल्या काही महिन्यांमध्ये बदलेला नाही. महाराष्ट्रात दिवसभरात 665 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण राज्यात 64 लाख 80 हजार 61 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट आता 97.7 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 51 लाख 55 हजार 293 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 32 हजार 723 नमुने पॉझिटिव्ह झाले आहेत. सध्या राज्यात 78 हजार 122 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1052 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 8106 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 852 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 32 हजार 723 इतकी झाली आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

राज्य सरकारच्या कोरोना अहवालाप्रमाणे 17 ते 24 नोव्हेंबरमधली परिस्थिती काय आहे?

पुणे - 1479

मुंबई-1710

ठाणे-959

अहमदनगर-608

नाशिक-324

एकूण- 5080

इतर जिल्हे-1372

राज्य-6452

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

कोरोना रूग्णसंख्या
Covid 19: कोरोनाचा युरोपमध्ये कहर, 7 लाख मृत्यू होतील अशी WHO ने व्यक्त केली भीती

युरोपमध्ये कोरोनाचा कहर

युरोपमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे, कारण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे हा व्हायरस वेगाने पसरला आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढला आहे. यानंतर WHO ने कोरोना व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून युरोपमध्ये 7 लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा देत भीती व्यक्त केली आहे. युरोपातल्या 53 देशांमध्ये सात लाख मृत्यू होऊ शकतात असं WHO ने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in