Covid 19 : महाराष्ट्रात 997 नव्या रूग्णांचं निदान, 28 मृत्यूंची नोंद

Covid 19 : महाराष्ट्रात 997 नव्या रूग्णांचं निदान, 28 मृत्यूंची नोंद
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात 997 नवे कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 28 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 1016 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 64 हजार 948 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 36 लाख 30 हजार 632 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण 66 लाख 21 हजार 420 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 10 हजार 264 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 876 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 12 हजार 352 सक्रिय रूग्ण आहेत.

आज महाराष्ट्रात 997 नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 21 हजार 420 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे...
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे...AajTak

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण (फोटो सौजन्य: Jaison G)

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

जॉन्स हाफकिन्स युनिव्हर्सिटीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लोच्या अंदाजानुसार, 1950 पासून राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे. जागतिक स्तरावर, कोरोना व्हायरस साथीचा रोग आता हृदयविकार आणि स्ट्रोक नंतर मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in