Covid 19 : महाराष्ट्रात मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रूग्ण 1800 पेक्षाही कमी

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.33 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रूग्ण 1800 पेक्षाही कमी
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या कमी (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात दिवसभरात 1736 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. तर राज्यात 36 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 3033 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 4 हजार 320 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.34 टक्के इतकं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 3 लाख 3 हजार 740 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 79 हजार 608 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 38 हजार 474 होम क्वारंटाईन आहेत तर 1163 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात 32 हजार 115 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 1736 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 79 हजार 608 इतकी झाली आहे.

कोरोना
कोरोना Photo- India Today

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आज राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या कमी
Covid 19: KEM रुग्णालयातील MBBS च्या 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात 7 ऑक्टोबरला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मिशन कवच कुंडल या नवीन मोहिमेची घोषणाही केली. या मोहिमच्या अंतर्गत राज्यात 15 ऑक्टोबरपर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कुठेही लसींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आङे. 8 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात रोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे सध्या एक कोटी लसी उपलब्ध आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरून आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. लसीकरण हाच आता मोठा पर्याय आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.