Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1003 नव्या रूग्णांचं निदान, 32 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1003 नव्या रूग्णांचं निदान, 32 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रातील कोरोना चाचणी (फोटो सौजन्य - India Today)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 1003 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा गेल्या काही महिन्यांपासून 2.12 टक्के इतकाच आहे तो आजही तेवढाच नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 1052 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 70 हजार 791 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.64 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 42 लाख 67 हजार 953 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 26 हजार 875 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 517 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1056 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 11 हजार 766 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचणी
कोव्हिड सेंटरमध्ये दोन बोगस कोरोना रूग्ण दाखल, औरंगाबादमधला धक्कादायक प्रकार

एक हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई- 3568

ठाणे-1293

पुणे-2882

अहमदनगर-1299

महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबई त्यानंतर पुणे, त्यानंतर ठाणे आणि मग अहमदनगर असे आहेत.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्याप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in