Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2876 रूग्णांचं निदान, 90 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के
Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2876  रूग्णांचं निदान, 90 मृत्यूंची नोंद
Maharashtra Corona Cases(फाइल फोटो)

महाराष्ट्रात आज दिवसभऱात 2876 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे तर 90 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 2763 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 91 हजार 662 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.32 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 67 हजार 791 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 760 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1416 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 33 हजार 181 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2876 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 67 हजार 791 इतकी झाली आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रात सलग चार दिवस रूग्णसंख्येत घट

शनिवार 2 ऑक्टोबर - 2696 पॉझिटिव्ह रूग्ण

रविवार 3 ऑक्टोबर- 2692 पॉझिटिव्ह रूग्ण

सोमवार 4 ऑक्टोबर- 2026 पॉझिटिव्ह रूग्ण

मंगळवार 5 ऑक्टोबर - 2401 पॉझिटिव्ह रूग्ण

20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या

20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते

27 आणि 28 सप्टेंबर या सलग दोन दिवशी रूग्णसंख्येत घट

त्यानंतर 27 सप्टेंबरला 2432 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती.तर 28 सप्टेंबरला 2844 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती. सलग दोन दिवस रूग्णसंख्या 3 हजारांच्या आत होती.

Maharashtra Corona Cases
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार

राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय

राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी 7 ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून मंदिरं सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in