Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 569 नवीन रूग्णांचं निदान, 5 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे
 कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

आज महाराष्ट्रात दिवसभरात 569 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे तर पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून कमी झालेला नाही. महाराष्ट्रात आज दिवसभरात 498 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 93 हजार 2 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 69 लाख 58 हजार 681 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 44 हजार 452 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 190 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 कोरोना रुग्णसंख्या
काळजीत भर! Omicron मुळे जगातला पहिला मृत्यू, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. ( मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ आणि लातूर -१ ).

यापैकी ९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या २ रुग्णांची माहिती –

लक्षणे - दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित.

पुणे रुग्ण – ३९ वर्षाची महिला . लातूर रुग्ण – ३३ वर्षाचा पुरुष

सध्या दोघेही विलगीकरणात

आंतरराष्ट्रीय प्रवास – दुबई.

या दोन्ही रुग्णांचे प्रत्येकी ३ निकटसहवासित कोविड निगेटिव्ह.

दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

 कोरोना रुग्णसंख्या
Kareena Kapoor-Amrita Arora कोरोना पॉझिटिव्ह, 2 दिवसापूर्वी गेल्या होत्या करण जोहरच्या पार्टीला

राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

आज राज्यात ५६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४४,४५२ झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in