Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 695 नव्या रूग्णांचं निदान, 12 मृत्यूंची नोंद

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 695 नव्या रूग्णांचं निदान, 12 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रात कोरोनाच्या 695 नव्या रूग्णांचं निदान दिवसभरात झालं आहे. तर 12 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यू दर 2.12 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात राज्यात 631 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 90 हजार 936 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 66 लाख 39 हजार 988 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 42 हजार 342 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 75 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे आणखी सात रुग्ण आढळले आहेत. यातील तीन रुग्ण मुंबईचे तर चार रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे.

आज मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे अनुक्रमे 48, 25 आणि ३७ वर्षांचे पुरुष असून त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका-नैरोबी या देशांमध्ये प्रवास केलेला आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये आढललेले चारही रुग्ण हे नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत.

कोरोना रुग्ण संख्या
Omicron Variant : धारावीतील नागरिक निघाला 'ओमिक्रॉन' पॉझिटिव्ह!

आज आढळलेल्या 7 रुग्णांपैकी चार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकरण झालेले नाही. चार रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर तीन रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.

याशिवाय राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 89 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 47 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in