Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 751 नव्या रूग्णांचं निदान, 15 मृत्यूंची नोंद

Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 751 नव्या रूग्णांचं निदान, 15 मृत्यूंची नोंद
कोरोना रूग्ण (फाइल फोटो)

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाच्या 751 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1555 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 64 लाख 60 हजार 663 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 33 लाख 2 हजार 489 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 18 हजार 347 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 38 हजार 179 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 856 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 13 हजार 649 सक्रिय रूग्ण आहेत.

आज राज्यात 751 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 18 हजार 347 इतकी झाली आहे. दिनांक 4 ते 7 नोव्हेंबर 2021 या दिवाळी कालावधीतील दुहेरी नोंद असलेले बाधित रुग्ण वगळल्यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांच्या संख्येत आज 58 ने घट झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो, असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

जॉन्स हाफकिन्स युनिव्हर्सिटीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लोच्या अंदाजानुसार, 1950 पासून राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे. जागतिक स्तरावर, कोरोना व्हायरस साथीचा रोग आता हृदयविकार आणि स्ट्रोक नंतर मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in