Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 802 रूग्णांचं निदान, 17 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 802 रूग्णांचं निदान, 17 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात दिवसभरात 802 रूग्णांचं निदान झालं आहे तर 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 886 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 64 लाख 57 हजार 149 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 31 लाख 4 हजार 874 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 16 हजार 101 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आऱोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. सध्या राज्यात 1 लाख 49 हजार 126 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 14 हजार 959 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 802 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 16 हजार 101 इतकी झाली आहे.

 कोरोना रुग्ण
कोरोना रुग्ण (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईत 238 नवे रूग्ण

मुंबईत आज दिवसभरात 238 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 276 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभरात 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. तर आज घडीला मुंबईत 3326 सक्रिय रूग्ण आहेत. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 35 हजार 135 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत आज जे चार मृत्यू नोंदवण्यात आले त्यापैकी तीन पुरुष आणि एक महिला आहे. या सगळ्यांचं वय 60 वर्षांवरील होतं. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
Covid 19: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, विमानं रद्द, शाळा बंद अनेक जागी लॉकडाऊन

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

जॉन्स हाफकिन्स युनिव्हर्सिटीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लोच्या अंदाजानुसार, 1950 पासून राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे. जागतिक स्तरावर, कोरोना व्हायरस साथीचा रोग आता हृदयविकार आणि स्ट्रोक नंतर मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in