Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 832 नव्या रूग्णांचं निदान, 33 मृत्यूंची नोंद

Covid 19 Cases : राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे
covid 19 in maharashtra 832 new patients were diagnosed in a day 33 deaths were recorded
covid 19 in maharashtra 832 new patients were diagnosed in a day 33 deaths were recorded(फाइल फोटो)

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. असं असताना महाराष्ट्रात दिवसभरात 832 नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. याशिवाय 33 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतकं झालं आहे.

आज राज्यात 832 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 81 हजार 640 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 53 लाख 57 हजार 358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 34 हजार 444 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 85 हजार 874 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1043 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 8193 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 832 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 34 हजार 444 इतकी झाली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

covid 19 in maharashtra 832 new patients were diagnosed in a day 33 deaths were recorded
कोरोना प्रतिबंधक नियम मोडल्यास 10 हजारापर्यंत होणार दंड, राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

युरोपमध्ये कोरोनाचा कहर

युरोपमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे, कारण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे हा व्हायरस वेगाने पसरला आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढला आहे.

यानंतर WHO ने कोरोना व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून युरोपमध्ये 7 लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा देत भीती व्यक्त केली आहे. युरोपातल्या 53 देशांमध्ये सात लाख मृत्यू होऊ शकतात असं WHO ने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in