Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 963 रूग्णांचं निदान, 24 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.65 टक्के इतका झाला आहे
Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 963 रूग्णांचं निदान, 24 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 963 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 24 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा मृत्यूदर कमी झालेला नाही. आज दिवसभरात राज्यात 972 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 71 हजार 763 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
कोव्हिड सेंटरमध्ये दोन बोगस कोरोना रूग्ण दाखल, औरंगाबादमधला धक्कादायक प्रकार

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 43 लाख 84 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 27 हजार 838 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 282 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 11 हजार 732 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 963 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 27 हजार 838 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे...
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे...AajTak

मुंबईत दिवसभरात 230 रूग्ण

मुंबईत दिवसभरात 230 रूग्णांचं निदान झालं आहे. तर 204 व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 38 हजार 803 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. मुंबईत आज घडीला 2845 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईत आज एक कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
दिवाळीच्या दिवशीच गुड न्यूज! कोरोना झाल्यास घेता येणार गोळी, इंग्लंडमध्ये मिळाली मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आढळलेले रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in