Corona cases in India: कोरोनाचा सुपर स्पीड... 24 तासात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण

Corona cases in India: कोरोनाचा सुपर स्पीड... 24 तासात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण
covid 19 india 2.5 lakh new corona cases in last 24 hours omicron variant cases also cross 5000(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: देशात कोरोनाचा वेग सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 लाख 17 हजार 531 एवढी झाली आहे. देशात सापडलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही कालच्या तुलनेत तब्बल 27.1% जास्त आहेत. गेल्या 24 तासात 1,62,212 अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेल्या टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 46,723 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर दिल्लीत 27,561, पश्चिम बंगालमध्ये 22,155, कर्नाटकात 21,390 आणि तामिळनाडूमध्ये 17,934 नवे रुग्ण सापडले आहेत. या पाच राज्यांमधून 54.87% नवे रुग्ण समोर आले आहेत. 18.88% नवीन रुग्ण हे एकट्या महाराष्ट्र सापडले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 481 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 4,84,859 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 300 मृत्यू झाले आहेत, तर दिल्लीत 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत एकूण 84,825 रुग्ण बरे झाले असून, देशभरातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 3,47,15,361 झाली आहे.

कोरोना दररोजचा पॉझिटिव्हिटी दर 13.11 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 10.80 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत एकूण 69.73 कोटी चाचण्या झाल्या आहेत. देशातील कोरोनाचा बरा होण्याचा दर 95.59% आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 154.61 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजारांच्या पुढे

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन या कोरोनाचे नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 5488 एवढी झाली आहे.

महाराष्ट्र 1,281 आणि राजस्थान 645 ही दोन्ही राज्यं यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दिल्लीत आतापर्यंत ओमिक्रॉनचे 546 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय कर्नाटक (479), केरळ (350), पश्चिम बंगाल (294), उत्तर प्रदेश (275), गुजरात (236), तामिळनाडू (185) आणि हरियाणा (162) ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत.

covid 19 india 2.5 lakh new corona cases in last 24 hours omicron variant cases also cross 5000
महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण, 300 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त

आतापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 1,805 रुग्ण बरे झाले आहेत. ओमिक्रॉनचे आता देशात 3,063 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह दर 1.1 टक्के होता, जो 12 जानेवारीला वाढून 11.05 टक्के झाला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, यूपी, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in