Covid 19 : महाराष्ट्रात 886 नव्या रूग्णांचं निदान, 34 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात 886 नव्या रूग्णांचं निदान, 34 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी (फाइल फोटो)

महाराष्ट्रात दिवसभरात 886 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झाला आहे. तर 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 948 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 64 लाख 69 हजार 739 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातलं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतकं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 41 लाख 55 हजार 107 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 25 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 98 हजार 703 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 11 हजार 847 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 886 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 25 हजार 872 झाली आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in