Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 686 नवे रूग्ण, 19 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 97.64 टक्के इतका झाला आहे
Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 686 नवे रूग्ण, 19 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्ण संख्याप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात आज दिवसभरात 686 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा दर कमी झालेला नाही. आज दिवसभरात 912 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 64 लाख 68 हजार 791 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.64 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 40 लाख 52 हजार 219 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 24 हजार 986 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 99 हजार 859 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 11 हजार 943 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 686 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 24 हजार 986 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in