Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 848 नवे रूग्ण, 50 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.68 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 848 नवे रूग्ण, 50 मृत्यूंची नोंद
कोरोना रूग्ण (फाइल फोटो)

महाराष्ट्रात दिवसभरात 848 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा आजही 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज 974 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.68 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 50 लाख 47 हजार 491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 33 हजार 105 नमुने आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 90 हजार 538 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1065 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज आज घडीला 9187 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 848 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 33 हजार 105 इतकी झाली आहे.

कोरोना रूग्ण
Covid 19: कोरोनाचा युरोपमध्ये कहर, 7 लाख मृत्यू होतील अशी WHO ने व्यक्त केली भीती

राज्य सरकारच्या कोरोना अहवालाप्रमाणे 17 ते 24 नोव्हेंबरमधली परिस्थिती काय आहे?

पुणे - 1479

मुंबई-1710

ठाणे-959

अहमदनगर-608

नाशिक-324

एकूण- 5080

इतर जिल्हे-1372

राज्य-6452

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

कोरोना रुग्ण
कोरोना रुग्ण ADSC

युरोपमध्ये कोरोनाचा कहर

युरोपमध्ये कोरोनाचा कहर माजला आहे, कारण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. युरोपात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे हा व्हायरस वेगाने पसरला आहे. मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणं या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढला आहे. यानंतर WHO ने कोरोना व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून युरोपमध्ये 7 लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा देत भीती व्यक्त केली आहे. युरोपातल्या 53 देशांमध्ये सात लाख मृत्यू होऊ शकतात असं WHO ने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in