Covid 19: महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी घटली पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या, 39 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हर रेट 97.32 टक्के
Covid 19: महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी घटली पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या, 39 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत घट झालेली पाहण्यास मिळते आहे. आज दिवसभरात 2401 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 2840 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 63 लाख 88 हजार 899 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.32 टक्के इतका झाला आहे.

आपण पाहुया तीन दिवसांची रूग्णसंख्या

शनिवार 2 ऑक्टोबर - 2696 पॉझिटिव्ह रूग्ण

रविवार 3 ऑक्टोबर- 2692 पॉझिटिव्ह रूग्ण

सोमवार 4 ऑक्टोबर- 2026 पॉझिटिव्ह रूग्ण

Covid 19: महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी घटली पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या, 39 मृत्यूंची नोंद
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या

20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते

27 आणि 28 सप्टेंबर या सलग दोन दिवशी रूग्णसंख्येत घट

त्यानंतर 27 सप्टेंबरला 2432 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती.तर 28 सप्टेंबरला 2844 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती. सलग दोन दिवस रूग्णसंख्या 3 हजारांच्या आत होती.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 94 लाख 69 हजार 53 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 64 हजार 915 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 40 हजार 52 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 33 हजार 159 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2401 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 64 हजार 915 इतकी झाली आहे.

Covid 19: महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी घटली पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या, 39 मृत्यूंची नोंद
Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!

राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार

राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय

राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत.

Related Stories

No stories found.