Covid-19: ..तर Omicron मुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते: राजेश टोपे
covid 19 omicron variant could cause third wave of corona in maharashtra rajesh tope(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

Covid-19: ..तर Omicron मुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते: राजेश टोपे

जालना: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन यामुळे संपूर्ण देशात आता चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अशातच आता महाराष्ट्राची देखील धाकधूक वाढली आहे. कारण महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत. अशावेळी आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर आपण काळजी घेतली नाही तर ओमिक्रॉनच्या रुपात तिसरी लाट येऊ शकते असं राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.

पाहा राजेश टोपे नेमकं काय म्हणाले:

'ओमिक्रॉनच्या बाबतीत लोकांच्या मनात साधारण जी दहशत झालेली आहे. ती दहशत स्वाभाविक आहे कारण आपल्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे एक धास्ती वाटते.'

'आपल्याला आज जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरुन असं काहीही वाटत नाही. की, फार सीरियस पेशंट होतात, फार प्रमाणात दवाखान्यांमध्ये भरती करावी लागते, फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज पडतेय.. आणि मृत्यूदर खूप जास्त आहे अशातला ओमिक्रॉनचा प्रॉब्लेम नाही.'

'ओमिक्रॉन खूप झपाट्याने पसरणारा आहे. कारण पूर्ण द. अफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटला पूर्णपणे रिप्लेस करण्याचं काम हे ओमिक्रॉनकडून झालेलं आहे. याचा अर्थ त्याच्या संसर्गाची जी गती आहे ती खूप जास्त आहे.'

'आता जसं कर्नाटकमध्ये आलं आहे. त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. त्यातूनही सात-आठ लोकं पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच संसर्ग वाढेल.

'ओमिक्रॉनच्या संसर्गाची भीती नक्कीच वाटते. त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. कदाचित जी तिसरी लाट पुढच्या काळात असू शकेल तर ती माइल्ड स्वरुपाने का होईना.. पण येऊ शकेत. परंतु असं सांगता येणार नाही. जर आपण काळजी नाही घेतली तर ती ओमिक्रॉनची देखील असू शकते.'

'मात्र, ओमिक्रॉनपासून घाबरण्याचं कारण नाही. द. आफ्रिका आणि ज्या-ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन आहे तिथे आपल्याला जो तज्ज्ञांचा अभ्यास आहे जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये मी आता जशी माहिती दिलेली त्यापद्धतीने काळजी करण्यासारखा विषय नाहीए.'

covid 19 omicron variant could cause third wave of corona in maharashtra rajesh tope
काळजी वाढली.. Omicron मुळे महाराष्ट्राला धडकी!

'संसर्ग वेगाने होतं पण धोकादायक अजिबात नाहीए. त्यामुळे हा जो मास्क आहे तो काढू नका. कुठल्याही परिस्थितीत गर्दी करु नका आणि सोशल डिस्टन्सिंग जास्तीत जास्त पाळा. आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवा. लसीकरण तात्काळ करुन घ्या.' अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in