Covid 19: दिल्लीत सर्व खासगी ऑफिसेस बंद, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Covid 19: दिल्लीत सर्व खासगी ऑफिसेस बंद, महाराष्ट्रात काय परिस्थिती?
covid 19 order to close all private offices in delhi strict restrictions apply(फाइल फोटो)

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. आता दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) हा आदेश दिला आहे. सध्या खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू होती. पण आता त्यांना देखील आता कार्यालयात येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

DDMAने अधिक कडक निर्बंध लादले आहेत. या आदेशानुसार दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट आणि बारही बंद करण्यात आले आहेत. मात्र, रेस्टॉरंटमधून घरपोच डिलिव्हरी आणि खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची सुविधा असेल. आतापर्यंत रेस्टॉरंट आणि बार देखील 50% क्षमतेने सुरू होते. कार्यालयांबद्दल बोलायचे झाल्यास आता केवळ Exempted Category/Essential Services च्या खाजगी कार्यालयांनाच या नियमातून सूट दिली जाईल.

दिल्लीत कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वीच खूप कडक निर्बंध लावण्यात आले होते. इथे रात्रीच्या कर्फ्यूनंतर वीकेंड कर्फ्यूही लागू करण्यात आला होता. मात्र त्याचा ठोस परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. त्यामुळेच आता दिल्लीत जवळजवळ लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कार्यालयांबाबत नेमका काय निर्णय?

महाराष्ट्रात देखील कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात देखील काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशावेळी आता राज्यात कार्यालयातील उपस्थितीबाबत नेमकी काय स्थिती आहे ते जाणून घेऊयात.

सध्या तरी महाराष्ट्रात खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनेच सुरु ठेवण्यास परवानगी आहे. पण जर कोरोना रुग्ण वाढू लागले तर येथील प्रशासन देखील दिल्लीसारखेच नियम याबाबतीत लागू करु शकतात.

देशात कोरोनाचा कहर

सध्या देशात आणि राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 277 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत हा आकडा निश्चितच कमी असला तरी परिस्थिती चिंताजनक आहे.

राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे तर, सोमवारी 19,166 नवीन कोविड रुग्ण आढळले आणि 17 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत संसर्गाचे प्रमाण 25 टक्क्यांवर पोहोचले आहे. येथे चाचणीमधील प्रत्येक चौथ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. 5 मे 2021 नंतर संसर्गाचे हे प्रमाण सर्वाधिक आहे.

covid 19 order to close all private offices in delhi strict restrictions apply
पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेणार पंतप्रधान मोदी?, थोड्याच वेळात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 33,470 नवे रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 13,648 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in