Booster Dose: कोरोना लसीचा तिसरा डोस आजपासून मिळणार, जाणून घ्या याबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Booster Dose in India: आजपासून आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक लोकांना लसीचा बूस्टर डोस मिळणार आहे. जाणून घ्या याबाबत आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तरं.
Booster Dose: कोरोना लसीचा तिसरा डोस आजपासून मिळणार, जाणून घ्या याबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
covid 19 third dose of corona vaccine will be taken from 10 jan 2022 know the answer to every question booster dose(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: पीटीआय)

मुंबई: देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोस किंवा प्रीकॉशन डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. आजपासून (10 जानेवारी) आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60+ पेक्षा जास्त व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे. पण या बूस्टर डोसबाबतही अनेक प्रश्न आहेत, जसे की कोणती लस दिली जाणार? पुन्हा नोंदणी करावी लागेल की नाही? मी किती दिवसांनी बूस्टर डोस घेऊ शकतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात सविस्तरपणे.

कोणती लस दिली जाईल?

याबाबत भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्यांना बूस्टर डोस मिळणार आहे त्यांना तीच लस दिली जाईल जी त्यांना पहिले दोन डोसच्या वेळी देण्यात आली आहे. याचा अर्थ जर तुम्हाला कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील, तर बूस्टर देखील कोव्हिशील्डचाच दिला जाईल.

नोंदणी (Registration) करावी लागेल का?

आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, ज्या लोकांना बूस्टर डोस देण्यात आहे त्यांना पुन्हा कोविन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासमोर दोन पर्याय असणार आहेत. पहिला म्हणजे ते Cowin अॅपवर अपॉइंटमेंट घेऊ शकतात. कारण आता तिसर्‍या डोसबाबत अॅपवर स्वतंत्र फीचरही जोडण्यात आले आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट सहजपणे घेता येईल. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करू शकता. तसेच पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.

बूस्टर डोस किती दिवसांनी मिळू शकतो?

जर तुम्हाला कोरोना लसीचा दुसरा डोस 9 महिन्यांपूर्वी मिळाला असेल, तर तुम्ही तिसऱ्या डोससाठी अर्ज करू शकता. 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास, बूस्टर डोस अद्याप दिला जाणार नाही.

(फोटो सौजन्य: एपी)

लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र दाखवावे लागेल का?

तुमचे वय 60 हून अधिक असल्यास आणि तुम्हाला इतर आजारांनीही ग्रासले असल्यास, तुम्हाला कोणत्याही नोंदणी किंवा प्रमाणपत्राशिवाय लस मिळेल. मात्र तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला जाऊ शकतो. असे आरोग्य मंत्रालयाने निश्चितपणे सांगितले आहे. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शनची लसीकरणादरम्यान गरज भासणार नाही.

बूस्टर डोसनंतर लसीचे प्रमाणपत्र मिळेल का?

होय, जर तुम्हाला लसीचा तिसरा डोस मिळाला असेल, तर नेहमीप्रमाणे तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल फोनवर प्रमाणपत्र दिले जाईल. तारखेपासून इतर महत्त्वाची माहिती त्यात असेल.

आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला बूस्टर मिळू शकतो का?

नाही, फक्त त्या फ्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना बूस्टर डोस दिले जातील जे कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर सक्रियपणे कर्तव्य बजावत आहेत. फ्रंटलाइन वर्करमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी सामील आहेत.

covid 19 third dose of corona vaccine will be taken from 10 jan 2022 know the answer to every question booster dose
Covid 19: 'कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक'

लसीकरण केंद्रात कोणते कागदपत्रे घेऊन जावे लागतील?

जर तुम्हाला बूस्टर डोस मिळणार असेल, तर तुम्ही तुमच्यासोबत मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवावे. त्यावर आधारित, तुम्हाला लसीचा बूस्टर डोस दिला जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in