Covid update : देशातील कोरोना मृतांची संख्या साडेचार लाखांच्या पुढे

24 तासांत 248 रुग्णांचा मृत्यू : महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Covid update : देशातील कोरोना मृतांची संख्या साडेचार लाखांच्या पुढे
देशात 24 तासांत आढळले 19 हजार 740 कोरोनाबाधित(फाइल फोटो)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचं परिस्थिती आहे. मात्र, असं असलं तरी देशात दररोज कमी अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं दररोज होणाऱ्या कोरोना मृतांची संख्या घटली आहे. मात्र, देशातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची मृतांच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज नवीन कोरोना बाधितांच्या संख्येसह देशातील कोरोना परिस्थितीबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. गेल्या 24 तासांतील कोरोना आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, देशांत मागच्या 24 तासांत 19 हजार 740 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल (8 ऑक्टोबर) आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या 7.1 टक्क्यांनी कमी आहे.

देशातील एकूण संख्या 3,39,35,309 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या राज्यात केरळ पहिल्या क्रमाकांवर आहे. केरळमध्ये 24 तासांत 10 हजार 944 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ महाराष्ट (2,620), तामिळनाडू (1,359), मिझोराम (950) आणि पश्चिम बंगाल (784) या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशात 24 तासांत आढळले 19 हजार 740 कोरोनाबाधित
लसीकरणाचा कोल्हापुरी पॅटर्न! विशेष मोहिमेत 122 महिलांचं लसीकरण, लकी ड्रॉमधून मिळणार बक्षीसं

24 तासांत आढळून आलेल्या देशातील एकूण रुग्णांपैकी 84.37 टक्के रुग्ण या पाच राज्यातील आहेत. तर 55.44 टक्के रुग्ण एकट्या केरळातील आहेत. नवीन कोरोना बाधितांप्रमाणे देशात गेल्या 24 तासांत 248 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 4,50,375 वर पोहोचला आहे.

देशात 24 तासांत आढळले 19 हजार 740 कोरोनाबाधित
Covid 19: महाराष्ट्रात 2620 नव्या रूग्णांचं निदान, 59 मृत्यूंची नोंद

मागील 24 तासांत सर्वाधिक कोरोना मृत्यू केरळात नोंदवले गेले आहेत. केरळात 120, तर महाराष्ट्रात 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरं होण्याची सरासरी) 97.98 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासांत देशात 23,070 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 3,32,48,291 वर पोहोचली आहे.

देशात सध्या 2,36,643 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर याच कालावधीत देशात 79,12,202 लोकांचं लसीकरण करण्यात आलं. त्यामुळे लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या 93,99,15,323 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.