Covid Update : कोरोनानं पुन्ह भरवली धडकी! 24 तासांत 406 मृत्यू, 22,775 रुग्णांची नोंद

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराबरोबर देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे... महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ
Covid Update : कोरोनानं पुन्ह भरवली धडकी! 24 तासांत 406 मृत्यू, 22,775 रुग्णांची नोंद
देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला...(प्रातिनिधिक फोटो)

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरत असतानाच देशात तिसऱ्या लाटेनं धडक दिली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगानं होत असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांतच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात 22,775 कोरोनाबाधित आढळून आले असून, यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात झाली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडकी भरवली आहे. देशातही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असून, ओमिक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे.

देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला...
Corona : मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एका दिवसात आढळले 5,631 रूग्ण

देशात 24 तासांत 22,775 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मृतांची संख्याही दुप्पटीने वाढली आहे. सध्या देशात 1,04,781 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर रिकव्हरी रेट 98.32 टक्के इतका आहे. देशातील पाच राज्यांत सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत असून, यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.

24 तासांत महाराष्ट्रात 8,067 रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल 3,451, केरळ 2,676, दिल्लीत 1,796 आणि तामिळनाडूमध्ये 1,155 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 75.28 टक्के रुग्ण या पाच राज्यांत आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील रुग्ण 35.42 टक्के इतके आहेत.

देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला...
संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या 1,431 वर

तीन महिन्यानंतर सर्वाधिक रुग्णवाढ

275 दिवसांनंतर देशात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी 3 ऑक्टोबर 2021 रोजी देशात 22,842 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली होती. मात्र, आता पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कालच्या (31 डिसेंबर 2021) तुलनेत रुग्णसंख्या 35.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

केरळात सर्वाधिक मृत्यू

देशात कोरोना मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात 406 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी 353 मृत्यूंची नोंद केरळात झाली आहे. तर 11 मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले आहेत. 356 दिवसांपूर्वी देशात 434 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4 लाख 81 हजार 486 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in