Covid XE symptoms : एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झाल्यास लहान मुलांमध्ये दिसतात ७ लक्षणं

Covid 7 symptoms in kids : कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटमुळे मुलांना जास्त संसर्ग होऊ लागला आहे...
Covid XE symptoms : एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झाल्यास लहान मुलांमध्ये दिसतात ७ लक्षणं

जगभरात पुन्हा नव्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. भारतातही नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले असून, चिंता वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. या व्हेरियंटमुळे कोरोनाच्या इतर लक्षणांबरोबरच काही वेगळी लक्षणं दिसून येत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोना झाला, तरी पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण लहान मुलांमध्ये दिसून येणारी लक्षणं सौम्य स्वरुपाची आहेत. वेळेवर उपचार केल्यास मुल लवकर बरं होऊ शकते. मात्र, यासाठी कोरोनाची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

मुलांमध्ये दिसणारी कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटची लक्षणे

कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटचा संसर्गाचा वेग मागील व्हेरियंटपेक्षा अधिक असल्याचा सांगितला जात आहे. त्यामुळे लहान मुलांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

१) ताप

२) सर्दी

३) घशात खवखव

४) अंगदुखी

५) कोरडा खोकला

६) मळमळ होणे

७) जुलाब

तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे लहान मुलांना सूजही येऊ शकते. शरीरावरील सूज अनेक आठवडे राहू शकते. लहान मुलांच्या अंगावर येणाऱ्या या सूजेला मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोम म्हटलं जातं. यातील सर्वसाधारण लक्षणांमध्ये ताप, मानदुखी, डोळे लाल होणं, अशक्तपणा, ओठ फाटणे, हाथ आणि पाय सुजणे, गळ्यात सूज आणि पोटदुखी यांचा समावेश आहे.

अशी लक्षणं मुलांमध्ये दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

लहान मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोममध्ये लहान मुलांच्या विविध भागावर सूज येते. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, डोकं, त्वचा, डोळे आदी भागांवर सूज येते. मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोम नेमकं कशामुळे होतो, याबद्दलची निश्चित कारण अद्याप सापडलेली नाहीत. मात्र, जास्तीत जास्त मुलांमध्ये कोरोनामुळे मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं आढळून येत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार वेळेवर उपचार केल्यास मुलं या सिंड्रोममधून बरी होऊ शकतात.

कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांच्या स्वच्छतेबद्दल काळजी घेतली पाहिजे. हाथ व्यवस्थित धुण्याची सवय मुलांना लावायला हवी. लहान मुलांचं बाहेर फिरणं मर्यादित ठेवावं. त्याचबरोबर त्यांची रोग प्रतिकाकर शक्ती (इम्युनिटी) वाढवण्यासाठी आहार योग्य द्यावा.

Related Stories

No stories found.