Corona : ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही; योगी सरकारचा दावा

देशभरात मृत्यूचं तांडव घालणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशातही गंगेच्या पात्रातही तरंगलेले मृतदेह आढळून आले होते...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आणि ऑक्सिजनच्या मागणी अचानक वाढ झाल्यानं तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. योगी सरकारनेच हा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी राज्य सरकारकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूबद्दल माहिती विचारली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक; नव्या अभ्यासात समोर आली महत्त्वाची माहिती

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सध्या उत्तर प्रदेश विधिमंडळाचं तीन दिवसीय हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. अधिवेशनात काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांना ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूबद्दल माहिती विचारली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले आहेत का? जर झाले असतील, तर जनपद-लखनौ, वाराणसी, गोरखपूरमध्ये किती मृत्य झाले? त्याची माहिती सभागृहात देणार आहात का? असा लेखी प्रश्न दीपक सिंह यांनी आरोग्यमंत्र्यांना विचारला होता.

'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात ऑक्सिजनअभावी एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे सभागृहात माहिती देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही', असं उत्तर आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी दिलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 877 नवीन रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनच्या एकाही रूग्णाची आज नोंद नाही

उत्तर प्रदेश सरकारने केंद्रालाही दिली नाही माहिती

संसदेचंही दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या काळातही ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंची माहिती विचारण्यात आली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दलची माहिती दिली होती. ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंबद्दल केंद्र सरकारने राज्यांना माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, आतापर्यंत पंजाब आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांनीच माहिती दिल्याचं मांडविया यांनी लेखी उत्तरात सांगितलं.

भारतात एप्रिल ते जून या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. या काळात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची आवश्यक असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे देशातील विविध भागांतून ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. याच काळात ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in