Covid19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1151 नव्या रूग्णांचं निदान, 23 मृत्यूंची नोंद

राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे.
कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात दिवसभरात 1151 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 23 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 2594 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात 77 लाख 2 हजार 217 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतकं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 74 लाख 84 हजार 141 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 61 हजार 468 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 64 हजार 50 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 922 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आजपर्यंत राज्यात 4509 ओमिक्रॉन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 4345 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आजपर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे 8904 नमुने जनुकीय पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 8044 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 860 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

महाराष्ट्रात आज घडीला 11604 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 1151 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 78 लाख 61 हजार 468 इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in