Crime: बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा नाल्यात सापडला मृतदेह, तब्बल 2 वर्षाने उलगडलं हत्येचं गूढ!

Crime: बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा नाल्यात सापडला मृतदेह, तब्बल 2 वर्षाने उलगडलं हत्येचं गूढ!
crime father killed minor daughter death boyfriend secret revealed after two year(प्रातिनिधिक फोटो)

सतना (मध्यप्रदेश): ऑनर किलिंगची एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. खरं तर हे प्रकरण जवळजवळ 2 वर्षांपूर्वीचं होतं. जे आता उघड झालं आहे. हे संपूर्ण प्रकरण 7 ऑक्टोबर 2019 रोजीचं आहे. पण आता त्याचा संपूर्ण खुलासा झाला आहे.

एका व्यक्तीने आपली मुलगी नेहा ही 10 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, तब्बल 8 महिन्यांनंतर मध्यप्रदेशमधील डागडीहा गावापासून 17 किमी दूर नाल्याजवळ एका स्त्री जातीचा सांगाडा आढळून आला होता. ज्याच्यासोबत कपडे, ब्लँकेट, पॉलिथिन आणि लॉकेटही सापडले होते.

यानंतर पोलिसांनी आठ महिन्यापूर्वी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ज्यांनी नोंदवली होती त्यांना यावेळी बोलावलं. मुलीचे वडील गोपी साकेत आणि कुटुंबीयांना बोलावून पोलिसांनी यावेळी जप्त केलेल्या वस्तू दाखवल्या आणि तिची ओळख पटवली. त्यावर कुटुंबीयांनी हा सांगाडा नेहा हिचाच असल्याचे सांगितले. तर डीएनए चाचणीनंतर हा मृतदेह नेहा हिचाच असल्याचं स्पष्ट झालं.

यासोबतच या गोष्टीचाही खुलासा झाला की, अल्पवयीन मुलीच्या मृत्यू डोक्यात काठी किंवा रॉडने जोरदार प्रहार करुन तिची हत्या करण्यात आली असावी. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या सगळ्या दरम्यान, मुलीचे वडील गावातून अचानक गायब झाले. त्यावरून पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. तेव्हापासून पोलिसांनी आरोपी वडिलांचा शोध सुरू केला आणि 19 महिन्यांनंतर त्याला 3 जानेवारीच्या रात्री खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून अबेर येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने मुलीच्या हत्येचे रहस्य उलगडले.

वडील गोपी यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत पाहिले होते. जे त्यांना अजिबात आवडले नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. ऑनर किलिंगचे हे प्रकरण सतना येथील आहे.

crime father killed minor daughter death boyfriend secret revealed after two year
औरंगाबादमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून बहिणीला कोयत्याने गळा चिरून संपवलं

दीड वर्षापूर्वी नेहाचे वडील गोपी साकेत याने आपल्या मुलीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर तिला काठीने बेदम मारहाण करून तिची हत्या केली होती. ज्यानंतर तिचा मृतदेह गोणीत भरून त्याने तो डागडिहा गावापासून 17 किमी अंतरावर असलेल्या एका नाल्यात फेकून दिला होता.

आपण मृतदेहाची विल्हेवाट लावली म्हणजे आपला गुन्हा आता उघडकीस येणार नाही अशी समजूत गोपी साकेत याची होती. मात्र, मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील तपासाला चालना मिळाली आणि अखेर गुन्हेगाराला अटक करण्यातही पोलिसांना यश आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in