Crime: तरुणांविरुद्ध दाखल करायची बलात्काराचा गुन्हा, शारीरिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला आईसह अटक

Crime: तरुणांसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर त्यांनाच बलात्कार केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणारी एक 20 तरुणी ही अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.
Crime: तरुणांविरुद्ध दाखल करायची बलात्काराचा गुन्हा, शारीरिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला आईसह अटक
crime police have arrested 20 year old girl accused of blackmailing(प्रातिनिधिक फोटो)

गुरुग्राम: दिल्लीनजीकच्या गुरुग्राममधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा खेळ सुरू करणाऱ्या अशा 'वसुली गर्ल'ला अटक करण्यात पोलिसांच्या टीमला यश आलं आहे.

पोलिसांत खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवून आरोपी तरुणी पीडित तरुणांकडून लाखो रुपयांची लूट करायची.

दुसरीकडे, एसीपी क्राईमच्या म्हणण्यानुसार, न्यू कॉलनी पोलिसांनी या 20 वर्षीय तरुणीला अटक करून ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या साऱ्या रॅकेटमध्ये तरुणीसोबत तिची आई आणि तिचा साथीदारही सामील होता.

आता पोलिसांनी तरुणीसह तिघांनाही अटक केली आहे. अद्यापही पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या तिघांशिवाय इतर कोण-कोण सहभागी होते याचाही चौकशी सध्या सुरु आहे. गुरुग्रामचे एसीपी क्राइम प्रीतपाल सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित मुलाने सांगितले की, 20 ऑगस्ट रोजी त्याची आरोपी मुलीशी डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. ज्यानंतर मुलीने त्याला हळूहळू आपल्या जाळ्यात गोवलं. एवढंच नव्हे तरुणीने तर दोनच दिवसात त्याच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत तरुणीने तरुणाला लग्न करण्यास भाग पाडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पद्धतशीरपणे इतर काही तरुणांना अडकवून तरुणीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देखील तरुणी पैसे उकळायचे. या सगळ्यातून तरुणीने लाखो रुपयांची वसुली केली आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी तरुणीने राजेंद्र पार्क, न्यू कॉलनी, सेक्टर 10, सिव्हिल लाइन्स, डीएलएफ फेज-1 आणि सायबर क्राइम पोलिसात वर्षभरात एकूण 7 तरुणांविरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलीस तपासात दोन प्रकरणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध करुन तिला अटक केली.

crime police have arrested 20 year old girl accused of blackmailing
डेटिंग अॅप, हॉटेलची रुम... १६ तरुणांना लुटणारी महिला

तरुणीला अटक केल्यानंतर अशी माहिती समोर आली की, तरुणीने 15 महिन्यांत तब्बल 8 जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in