सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दीच गर्दी; मुंबईची चिंता वाढवणारे फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे मुंबईत सध्या परिस्थिती बिकट झालेली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्य सरकारने अद्याप लॉकडाउनची घोषणा केलेली नसली तरीही काही प्रमाणात निर्बंध नक्कीच लादले आहेत. ज्यात बाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

परंतू प्रशासनाच्या या आवाहनाला मुंबईकर हरताळ फासताना दिसत आहे. मुंबईच्या पोईसर भागात बाजारपेठेत आज गर्दीचं हे रुप पहायला मिळालं.

ADVERTISEMENT

यावेळी पोईसरमधील बाजारपेठेतला हा रस्ता अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता. ज्यात सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच पण काही जण सर्रास विनामास्क फिरताना दिसत होते.

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणं दिसत असली तरीही भविष्यात या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईत सध्याच्या घडीला वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असली तरीही धोका पूर्णपणे टळलेला नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी वाढलेली आहे.

म्हणूनच राज्य शासनासह पालिका प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्कचा वापर अनिवार्य करत सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

परंतू प्रत्यक्षात मुंबईच्या रस्त्यांवर वेगळंच चित्र दिसत आहे, त्यामुळे अशा वागण्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात कशी येणार असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. वाचा संबंधित वृत्त

    follow whatsapp

    ADVERTISEMENT