COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचं चित्र रुग्ण वाढ होत असलेल्या अकोल्यात आहे
COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?

अकोल्यात कोरोनाचा कहर वाढतो आहे. ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याने काही अटी शिथील करून प्रशासनाने दुकानं उघडण्याची संमती दिली.

मात्र दुकानं उघडायची असतील तर कोव्हिड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र घेऊन या असं सांगितलं जातं आहे. या कारणामुळे कोरोना टेस्टिंग सेंटर्सवर तोबा गर्दी असल्याचं चित्र आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तरच दुकानं उघडण्यासाठी संमती मिळणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी कोव्हिड सेंटर्सवर गर्दी झाल्याचं चित्र पाहण्यास मिळतं आहे.

अकोल्यात कोरोनोचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात प्रशासनाने अकोल्यात कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र व्यापाऱ्यांनी या निर्बंधांबाबत प्रशासनावर दबाव टाकला. त्यामुळे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली. मात्र त्यासाठी एक अट घालण्यात आली. जर कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच दुकानदार, त्या दुकानात काम करणारे कर्मचारी यांना दुकान उघडता येईल.

त्यासाठी दुकानदार, त्या दुकानात काम करणारे कर्मचारी या सगळ्यांनी कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच संबंधित दुकान उघडण्यास परवानगी मिळणार आहे. ही अट घालण्यात आल्याने कोरोना चाचण्यांसाठी कोरोना सेंटर्सवर गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे.

COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?
कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे?

आज रात्रीपासून दुकानांच्यासंदर्भातले काही नियम शिथील करत आहोत. मात्र त्यासाठी आम्ही एक अट घातली आहे. कोरोना चाचणी झाल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही, दुकानाचा मालक आणि तिथे काम करणारे कर्मचारी या सगळ्यांचा कोरोना चाचणी अहवाल सोबत असणं बंधनकारक आहे. जर कुणी कोरोना चाचणी न करता दुकान उघडलं किंवा एकाही दुकानातला कर्मचारी किंवा मालक याच्या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल नसेल तर त्या दुकानावर दंडात्मक कारवाई केली जाईल एवढंच नाही तर ते दुकानही सील करण्यात येईल असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?
पाहा अमरावतीत कोरोना रुग्ण कमी झाले की नाही?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in