Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील
cruise drug party case shahrukh khan son aryan arrested ncb (फाइल फोटो)

Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील

NCB arrested Shahrukh Khan son Aryan cruise drug party case: क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी आता एनसीबीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक तास त्याच्यासह 8 जणांची चौकशी एनसीबीकडून सुरु होती. आता सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन अखेर एनसीबीने ड्रग्स पार्टीप्रकरणी आर्यन खानला अटक केली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा (दिल्लीतील फॅशन डिझायनर) या तिघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

पाहा एनसीबी कार्यालयात नेमकं काय घडलं?

एनसीबीने ज्या तीन लोकांना अटक करण्यात आली आहे त्यात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा समावेश आहे. तर आज पूर्ण दिवसक नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांची सतत चौकशी करण्यात येत होती.

आर्यन म्हणतो मी तर फक्त 'गेस्ट' म्हणून पार्टीत गेलो होतो

आर्यनने एनसीबीच्या चौकशीत असं म्हटलं आहे की, तो पार्टीमध्ये एक गेस्ट म्हणून गेला होता. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलं आहे की, पार्टीत सामील होण्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेण्यात आले नव्हते. त्याने असा दावा केला आहे की, पार्टीच्या आयोजकांनी त्याच्या नावाचा वापर करुन पार्टी आयोजित केली. मात्र, असं असलं तरीही आता आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.

या क्रूझ पार्टीमध्ये दिल्लीतील तीन मुली देखील होत्या. ज्यांना आज (3 ऑक्टोबर) दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं आहे. या तिघीही बड्या उद्योजकांच्या मुली आहेत. दरम्यान, याप्रकरणी एनसीबीने सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. ज्याची तपासणी देखील केली जात आहे.

cruise drug party case shahrukh khan son aryan arrested ncb
Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख 'पठाण' सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता

तिघांना अटक पाच जण NCB च्या ताब्यात

NCB ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 2 ऑक्टोबर रोजी Cordelia क्रूझवर छापा टाकण्यात आला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली. यावेळी एनसीबीच्या टीमला तिथून MDMA, कोकेन, MD आणि चरस यासारखे ड्रग्स आढळून आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

NCB अधिकारी प्रवासी म्हणून गेले होते क्रूझवर

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, टीमचे 22 अधिकारी साध्या कपड्यांमध्ये प्रवासी म्हणून क्रूझवर गेले होते. जहाजात सुमारे 1800 प्रवासी होते जेथे ड्रग्ज पार्टी करणार्‍या 8 लोकांना पकडण्यात आले. छापा टाकल्यानंतर, सर्व लोकांना मुंबई एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. जेथे याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, बॉलिवूड, फॅशन आणि उद्योग जगतातील संबंधित हाय प्रोफाइल लोक या पार्टीत जमले होते.

Related Stories

No stories found.