Cruise Drugs Case: CCTV मध्ये दिसली शाहरुख खानची मॅनेजर पूजाची कार, KP गोसावी अडकणार?

Shah Rukh Khan Manager Pooja Dadlani and KP Gosavi: मुंबई ड्रग्स केस प्रकरणी आता केपी गोसावी हाच अधिक अडकत चालल्याचे दिसत आहे.
Cruise Drugs Case: CCTV मध्ये दिसली शाहरुख खानची मॅनेजर पूजाची कार, KP गोसावी अडकणार?
cruise drugs case shah rukh manager pooja dadlani car cctv footage extortion case sit kp gosavi pune mumbai (फाइल फोटो)

मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्या मर्सिडीज कारबाबत एनसीबीचे साक्षीदार प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्रात जे नमूद केले होते त्याचे सीसीटीव्ही आता फुटेज सापडले आहे. मुंबई पोलिसांना लोअर परळ येथून हे फुटेज मिळाले आहे.

सीसीटीव्हीमध्ये पूजा ददलानीची कार दिसल्याच्या वृत्ताला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला ही पूजा ददलानीच आहे की नाही या गोष्टीला मात्र, दुजोरा मिळू शकलेला नाही. प्रभाकर साईल याने आर्यन खानला सोडण्याच्या बदल्यात केपी गोसावी याने समीर वानखेडेंच्या वतीने कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केले आहेत. ज्याची SIT मार्फत सध्या चौकशी सुरु आहे.

NCBचा साक्षीदार किरण गोसावी याने शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांना पैशाच्या बदल्यात आर्यन खानची अटक रोखण्याचे आश्वासन दिले होते असा आरोप प्रभाकर साईल याने केला आहे. अशा स्थितीत एसआयटी गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करू शकते. कारण तो क्रूझ ड्रग्ज प्रकरणातही साक्षीदार आहे. तसंच त्याच्या एसयूव्हीवर 'पोलीस' असंही लिहिलं आहे.

आता पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, गोसावी याने स्वत:ला एनसीबीचा अधिकारी असल्याचे भासवले होते का? त्याचबरोबर या प्रकरणी एसआयटी पूजा ददलानीचा देखील जबाब नोंदवू शकते.

नेमकं प्रकरण काय?

प्रभाकर सईलने दावा केला आहे की, एनसीबीच्या कारवाईनंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी यांनी 3 ऑक्टोबरला लोअर परेलमध्ये सॅम डिसूझा यांची भेट घेतली होती. सईलच्या दाव्यानंतर, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. ज्यामध्ये ददलानीची ब्ल्यू मर्सिडीज तसेच गोसावी आणि डिसूझा यांच्या इनोव्हा एसयूव्ही कारही दिसून आल्या आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर ती गोसावी याच्याशी बोलते, त्यानंतर दोघेही महिलेच्या गाडीतून निघून जातात. पण फुटेजमध्ये दिसणारी ही महिला नेमकी कोण आहे, याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.

सईलच्या दाव्यानुसार, लोअर परळमधी भेटीनंतर गोसावी यांना त्यांच्या वाशीतील घरी सोडले. यावेळी गोसावी याने सईलला हॉटेल टॅरेडो बाहेरून पैसे घेण्यास सांगितले होते. या दरम्यान कारमधून एक व्यक्ती आला आणि त्याने दोन पिशव्या दिल्या. सईल या बॅग ट्रायडंट हॉटेलमध्ये डिसूजा यांच्याकडे घेऊन गेला. तिथे डिसूजा यांनी पैसे मोजले आणि ते फक्त 38 लाख असल्याचे सांगितले. असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

दुसरीकडे, सईलने दावा केला आहे की, त्यांनी एक संभाषण ऐकले आहे ज्यात गोसावी आणि काही लोक 25 कोटींच्या मागणीवर चर्चा करत होते, ज्यामध्ये झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना 8 कोटी द्यायचे असल्याचेही बोलले गेले होते.

त्याच वेळी, एका टीव्ही मुलाखतीत डिसूझा याने दावा केला की, दादलानीकडून 50 लाख रुपये मिळाले होते. परंतु जेव्हा समजले की गोसावी हा खोटारडा व्यक्ती आहे तेव्हा आपण ती रक्कम परत केली. तो म्हणाला की गोसावींनी त्याला सांगितले की ज्याचा नंबर त्याच्या फोनमध्ये SW (समीर वानखेडे) म्हणून सेव्ह केला होता त्याच्याकडून त्याच्यावर दबाव होता, परंतु Truecaller द्वारे डिसूजा याला समजले की, तो नंबर सईलचा आहे.

cruise drugs case shah rukh manager pooja dadlani car cctv footage  extortion case sit kp gosavi pune mumbai
Aryan Khan: आर्यन खान 28 दिवसांनी 'मन्नत'वर परतला, जाणून घ्या ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण Timeline

या प्रकरणी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी डिसूझा याला चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र तो अद्याप आलेला नाही. आता एसआयटी गोसावी त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकते. मात्र, पुणे आणि आंबोली पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. तर गोसावी याला गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in