Cruise Drugs Party: आर्यन खानसह 3 आरोपींना एक दिवसाची NCB कस्टडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Cruise drugs party Aryan Khan remanded NCB custody: क्रूझ ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या कोर्टाने एक दिवसाची कस्टडी सुनावली आहे.
Cruise Drugs Party: आर्यन खानसह 3 आरोपींना एक दिवसाची NCB कस्टडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Cruise drugs party Aryan Khan remanded NCB custody (आर्यन खान आणि मुनमुन धमेचा)

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर शनिवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. क्रूझवर ड्रग पार्टी आयोजित होणार असल्याची माहिती एनसीबीला आधीच मिळाली होती त्यामुळे त्याच आधारे त्यांनी हा छापा टाकला होता. दरम्यान, या छापेमारी एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही लागला. अनेक तासांच्या चौकशीनंतर आर्यन खानला अटक करण्यात आली. थोड्याच वेळापूर्वी त्याला मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जिथे आर्यन खानसह तीन जणांना एक दिवसाची NCB कस्टडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी किला कोर्टाने आरोपी आर्यन खान याच्यासह दोन आरोपींना एक दिवसासाठी NCB ची कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे या तीनही आरोपींना आजची रात्र NCB च्या कस्टडीमध्ये घालवावी लागणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आता एक रात्र NCB च्या कस्टडीमध्ये ठेवलं जाणार आहे.

आर्यनच्या वतीने त्याचे वकील सतीश मनेशिंदे हे आता जामीन अर्ज दाखल करणार आहेत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचे वकीलही त्यांच्यासाठी जामीन अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत. सतीश मनेशिंदे यांनी म्हटले आहे की, ते आता कधीही जामिनासाठी याचिका दाखल करू शकतात.

कोर्टात नेमकं काय घडलं?

आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की, आर्यन खान हा काही स्वत: तिकीट काढून क्रूझ पार्टीला गेलेला नव्हता. आर्यनकडे पार्टीचे तिकीटही नव्हते. त्याला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच त्याच्या बॅगेत काहीही सापडले नाही.

आर्यनच्या फोनवरही देखील कोणतेच चॅट सापडलेले नाहीत. यासह, सतीश मानेशिंदे असंही म्हणाले की, आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात यावी, जेणेकरून तो नियमित न्यायालयात जाऊन जामीन याचिका दाखल करू शकेल आणि एनसीबी आर्यनच्या जामीन याचिकेवर कारवाई करू शकत नाही.

दरम्यान, असे सांगितले जात आहे की, आर्यन खानवर फक्त ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोप आहे. अशा स्थितीत तो जामिनास पात्र ठरु शकतो. मात्र, एनसीबीचे याबाबत असं म्हटलं की, आरोपींना ड्रग्जचे सेवन केल्याच्या आरोपावरून कोठडी दिली जाऊ शकते. आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये, ड्रग्ज तस्करांशी बरीच संभाषणे समोर आली आहेत. अशा स्थितीत किमान दोन दिवसांची कस्टडी मिळावी अशी NCB ने मागणी केली होती.

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा मोबाईल एनसीबीने जप्त केला आहे. आर्यनच्या मोबाईलवरून ड्रग्ज चॅट सापडले असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. उर्वरित अटक केलेल्या लोकांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडूनही ड्रग चॅट सापडले आहेत. असेही सांगितले जात आहे की, आर्यन खानने पार्टीचा एक भाग असल्याचे आणि ड्रग्जचे सेवन केल्याचे कबूल केले आहे आणि त्याने हौशी म्हणून ड्रग्सचे सेवन केल्याचे कबूल केले आहे.

आर्यनवर फक्त ड्रग्स सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटवर मात्र ड्रग्ज बाळगल्याचा आरोप आहे. एनसीबीने तिन्ही आरोपींची 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती.

एनसीबीने आर्यनवर काय-काय आरोप केले आहेत?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं. याबाबतचा उल्लेख एनसीबीने जारी केलेल्या अटकेच्या मेमोमध्ये करण्यात आला आहे. यासह इतरही वेगळ्या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

NCB चे अधिक्षक विश्व विजय सिंग यांनी आर्यन खान याला अटकेचं मेमो बजावलं आहे. ज्यामध्ये आर्यनवर ड्रग्ज बाळगणे, त्याचं सेवन करणे तसेच इतर गुन्हे लावण्यात आले आहे. NDPS Act, 1985 अंतर्गत 3 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आर्यनला अटक करण्यात आली. सेक्शन 20(b), 27, 35 NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Cruise drugs party Aryan Khan remanded NCB custody (आर्यन खान आणि मुनमुन धमेचा)
Cruise Drugs Party: आर्यन खान असलेल्या 'त्या' ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

दरम्यान, NCB ने या प्रकरणात 13 ग्राम कोकेन, 5 ग्राम MD, 21 ग्राम चरस आणि MDMA च्या 22 गोळ्या जप्त केल्यात. याशिवाय 1 लाख 33 हजार रुपयेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.