Drug Case: आर्यन खानचा आजचा मुक्कामही ऑर्थर रोड तुरुंगातच, कोर्टात नेमकं काय झालं?

Cruise Ship Raid Case: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आजची रात्र देखील तुरुंगातच काढावी लागणार आहे. पाहा कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणीत काय-काय घडलं.
Drug Case: आर्यन खानचा आजचा मुक्कामही ऑर्थर रोड तुरुंगातच, कोर्टात नेमकं काय झालं?
Shahrukh Khan's problem increased, court has extended jail term of Aryan Khan in drugs case

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणातील अडचणी अद्याप कमी होताना दिसत नाही. कारण आज (13 ऑक्टोबर) विशेष सत्र न्यायालयात आर्यन खानसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर जी सुनावणी घेण्यात आली ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे.

सध्या आर्यन खान हा न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यनला लवकरात लवकर जामीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, NCB देखील आर्यनला सुटू न देण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहे. ज्यामुळे अद्याप तरी आर्यनची सुटका झालेली नाही.

आज (13 ऑक्टोबर) विशेष सत्र न्यायालयात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी असल्याने त्या कोर्टाकडून जामीन मंजूर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आज तरी तसं काहीही झालेलं नाही. कारण, सत्र न्यायालयात सुरु झालेली सुनावणी बराच वेळ सुरु होती. त्यामुळे कोर्टाने याबाबत आजच काहीही निर्णय दिलेला नाही. ज्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

कोर्टात आर्यनचे वकील आणि एनसीबी यांच्यात बऱ्याच वेळ युक्तिवाद सुरु होता. ज्यानंतर आर्यनच्या जामीन अर्जावर कोर्ट उद्या निर्णय देणार असल्याचं सांगण्यात आलं.

जामीन अर्जावरील ही सुनावणी आज (13 ऑक्टोबर) सत्र न्यायालयात साधारण तीन वाजता सुरु झाली. यावेळी सुरुवातीला आर्यनच्या जामीन अर्जावर एनसीबी आणि आयर्नच्या वकिलांनी आपआपला युक्तिवाद केला. ही सुनावणी संध्याकाळापर्यंत सुरु होती.

दरम्यान, आर्यन खान ज्या आर्थर रोड तुरुंगात आहे त्या तुरुंगाचे दरवाजे हे संध्याकाळी 5.30 वाजता बंद केले जातात. त्यामुळे आता कोर्ट आर्यनच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबला आपला निर्णय सुनावणार आहे.

Shahrukh Khan's problem increased, court has extended jail term of Aryan Khan in drugs case
जामीन मिळण्यासाठी आर्यन खानने अर्जात सांगितली ही 15 कारणं..

आर्यनच्या जामीन अर्जावर NCB कोर्टाला काय दिलं उत्तर?

एनसीबीने यावेळी असे म्हटले आहे की, 'या प्रकरणात एका आरोपीची भूमिका दुसऱ्या आरोपीच्या माध्यमातून समजू शकत नाही. आर्यन खानकडे जरी ड्रग्स सापडलेले नसले तरी तो पेडलरच्या संपर्कात होता. हे एक मोठे षडयंत्र आहे. त्याची तपासणी होणं आवश्यक आहे. आर्यन खानवर अमली पदार्थ खरेदी केल्याचा आरोप होता आणि हेच अंमली पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आले होते.'

अशा स्वरुपाचं उत्तर एनसीबीने कोर्टात दाखल केलं होतं. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात कोर्ट आता नेमका काय निकाल देणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.