Cryptocurrency Bill : खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी?; RBI ची डिजिटल करन्सी येणार
मोदी सरकार बिटकॉईनसह सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीतIndia Today

Cryptocurrency Bill : खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी?; RBI ची डिजिटल करन्सी येणार

क्रिप्टोकरन्सीचा मुद्दा चर्चेत असून, खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची सरकारी तयारी... संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार विधेयक...

क्रिप्टोकरन्सीबद्दल केंद्र सरकार कठोर भूमिकेत असल्याचं दिसत आहे. मोदी सरकार बिटकॉईनसह सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत दिसत असून, त्यासाठी सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात 'द क्रिप्टो करन्सी अॅण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल-2021' (The Cryptocurrency & Regulation of Official Digital Currency Bill, 2021) मांडणार आहे.

सगळीकडे चर्चेत असलेल्या आणि अनेकजणांना आकर्षित करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे. क्रिप्टोकरन्सीबद्दल सरकार कठोर भूमिकेत असल्याचं दिसत असून, येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाणार आहे.

'द क्रिप्टो करन्सी अॅण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल-2021' हे खासगी विधेयक मांडलं जाणार असून, रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी काढण्यासंदर्भात सोयीस्कर फ्रेमवर्क तयार करण्याचा या विधेयकामागील उद्देश आहे.

 मोदी सरकार बिटकॉईनसह सर्व प्रकारच्या खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत
Cryptocurrency बाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या Rachana Ranade यांच्याकडून

या खासगी विधेयकात खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचंही दिसून येत आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सीचं तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराबद्दल सकारात्मक आहे. हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीबरोबर विधेयकाबरोबच तब्बल 26 विधेयक मांडण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे.

क्रिप्टोकरन्सी विधेयकाबद्दल सरकारमधील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितलं की, 'डिजिटल चलनाशी संबंधित संकल्पना आणि तंत्रज्ञान भारत पूर्णपणे बंद करणार नाही आणि चीनसारखी कठोर भूमिकाही घेणार नाही.'

RBI ने आपली बाजू सरकारला सांगितली

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आधीच क्रिप्टोकरन्सीबाबत आपली बाजू सरकारसमोर मांडली आहे. केंद्रीय बँकेने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच डिजिटल मालमत्तेवर आपली स्थिती स्पष्ट केली. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, 'डिजिटल चलनाबाबत आरबीआयच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आम्हाला क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठी चिंता आहे. जी आम्ही सरकारला कळवली आहे. गुंतवणुकदारांनीही डिजिटल चलनाबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.'

RBI ने असं म्हटलं असलं तरी भारत सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत चीनसारखी भूमिका घेण्यास तयार नाही. चीनने डिजिटल चलनावर आणि संपत्तीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारत सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियामकाच्या बाजूने आहे. त्यामुळेच आता क्रिप्टोकरन्सी कायदेशीर तरतूदींमध्ये आणली जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in