Cyclone Yaas: चक्रीवादळ 'यास'ने प्रचंड वेगाने सरकतंय, अम्फानपेक्षाही आहे भयंकर

Cyclone Yaas: चक्रीवादळ यासमुळे बंगालला अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ 'यास'
चक्रीवादळ 'यास'(फोटो सौजन्य - PTI)

नवी दिल्ली: तौकताई चक्रीवादळामुळे आता आणखी एक मोठे आव्हान भारतासमोर चक्रीवादळ यासच्या रूपाने समोर ठाकलं आहे. बंगाल-ओडिशाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. यावेळी एनडीआरएफसह इतर बर्‍याच एजन्सी या कामात सध्या गुंतल्या आहेत.

यास चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरात बराच वेग पकडला आहे आणि येत्या 24 तासात वादळ बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर आदळेल. तौकताई चक्रीवादळानंतर आता आणखी एक मोठे आव्हान भारतासमोर उभं राहिलं आहे. बंगाल-ओडिशाच्या किनारपट्टी भागातील गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच आता इथे त्या पद्धतीने उपाययोजना सुरु आहेत.

चक्रीवादळ 'यास'
‘यास’वादळामुळे मान्सून भारतात वेळेच्या आधी येऊ शकतो

किनारपट्टी भागात पावसाला सुरूवात

चक्रीवादळ यास हे ओडिशा आणि बंगालमध्ये 26 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. परंतु त्याचा परिणाम आजपासूनच ( मंगळवार) पाहायला मिळत आहे. मंगळवारी ओडिशाच्या बालासोर समुद्र किनारी चांदीपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येथे समुद्रात उंचच-उंच लाटा देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लोकांनी समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहे.

चक्रीवादळ यासच्या येण्याआधीच एनडीआरएफ आणि इतर एजन्सींनी या भागात आपली पथकं तैनात केली आहेत. बंगाल, ओडिशा येथे एनडीआरएफची अनेक पथकं गेल्या काही दिवसांपासून पाठविण्यात येत होते. काल एनडीआरएफची पथकं पूर्व मिदनापूरमध्ये येथे व्यूहरचना करताना पाहायला मिळाले होते. यावेळी त्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन देखील केले.

एनडीआरएफशिवाय भारतीय नौदलालाही सतर्क केले गेले आहे. मागील दोन दिवसांपासून समुद्राच्या सभोवतालच्या मच्छिमारांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर इतर नौका देखील किनाऱ्यावर परत आणल्या गेल्या आहेत.

चक्रीवादळ यासचा परिणाम बंगाल-ओडिशाच्या बालासोर, दिघा, सागर आयलंड, दक्षिण 24 परगणा भागात दिसून येईल. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळ अम्फानपेक्षा चक्रीवादळ यास हे अधिक विनाशकारी असेल अशी भीती व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, आमचा प्रयत्न हा 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा आहे.

ममता बॅनर्जी यांच्या मते, चक्रिवादळ यासचा प्रभाव 20 जिल्ह्यात दिसून येणार आहे. त्यापैकी कोलकाता, उत्तर व दक्षिण 24 परगणा, पूर्व मेदिनीपूर हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र असू शकतात. अम्फान चक्रीवादळाने ओडिशा-बंगालमध्ये बरंच नुकसान झालं होतं. त्याचा परिणाम अगदी कोलकाता शहरापर्यंतही पाहायला मिळाला होता.

चक्रीवादळ 'यास'
Tauktae नंतर आता 'Yaas' चक्रीवादळाचा इशारा, पाहा कुठे धडकणार हे वादळ

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी बंगाल, ओडिशा, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ममता बॅनर्जी स्वत: बंगालमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यावेळी त्या सचिवालयातच थांबणार आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच संकटाच्या या काळात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in