
मुंबईतल्या जोगेश्वरी या ठिकाणी रामवाडी भागातली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षांच्या तरूणीने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. मात्र मृत्यूआधी तिने जी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ती वाचून तिच्या वडिलांनाही धक्का बसला आहे. सुसाईड नोटमध्ये या मुलीने मोबाईलचा पासवर्ड लिहला आहे. तसंच त्याला सोडू नका असंही या नोटमध्ये लिहिलं आहे. जान्हवी विजय चव्हाण असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे.
काय आहे जान्हवीची सुसाईड नोट?
जान्हवी विजय चव्हाण या मुलीने रविवारी जोगेश्वरीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहिला आहे. पप्पा यात सगळे पुरावे आहेत त्याला सोडू नका असंही या नोटमध्ये लिहिलं आहे. आपलं निखिल नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. निखिलने आपल्या भावनांशी खेळ केला आणि घरातल्याचं कारण देत मला सोडून दिलं म्हणून मी जीव देत आहे असंही या नोटमध्ये लिहिलं आहे. निखिल आणि त्याच्या बहिणीचंही नाव जान्हवीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दोघांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या सुसाईड नोटमध्ये तिने केला आहे.
रविवारी म्हणजेच 23 जानेवारीला जान्हवीचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. ते रात्री साडेबाराच्या सुमारास घरी आले. तेव्हा घराबाहेरून त्यांना हे दिसलं की त्यांच्या मुलीने म्हणजेच जान्हवीने गळफास घेतला आहे. ही घटना पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी आराडाओरडा केल्याने शेजारी जमा झाले. ज्यानंतर या ठिकाणी पोलीसही आले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि जान्हवीला दवाखान्यात नेलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषि केलं.
जान्हवीला आई नाही. वडील कामानिमित्त बाहेर असतात. तर तिचा भाऊ लग्न झाल्याने विरार या ठिकाणी राहायला गेला. यामुळे जान्हवी एकटी पडली. विजय चव्हाण आणि जान्हवी हे जोगेश्वरीतल्या रामवाडीमध्ये राहतात. महापालिकेच्या जलविभागात विजय चव्हाण हे फिटर म्हणून काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. घरात एकट्या पडलेल्या जान्हवीचं निखिल नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. जान्हवी ही अंधेरीमध्ये असलेल्या कोव्हिड लसीकरण केंद्रात अटेंडंट म्हणून काम करत होती. वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर निखील आणि तिचे प्रेमसंबंध जुळले. हे दोघे फोनवरून सतत संपर्कात असत.
जान्हवीने आत्महत्या केल्यानंतर आणि तिची सुसाईड नोट समोर आल्यानंतर वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या सगळ्या घटनेनंतर निखिलला ताब्यात घेतलं आहे. मोबाईलचा पासवर्ड आपल्या नोटमध्ये लिहून जान्हवीने आत्महत्या केली आहे.