Ganesh Utsav : श्रीमंत दगडूशेठ गणपती अवतरणार आपल्या घरी, सांगत आहेत प्रशांत दामले

प्रशांत दामले यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल
फोटो सौजन्य
फोटो सौजन्यप्रशांत दामले, फेसबुक पेज

महाराष्ट्राचा लाडका मराठी अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमीशी असलेली आपली नाळ आणि त्याचसोबत मराठी प्रेक्षकांशी असलेलं मधुर नातं त्यांनी मनापासून जपलं आहे. आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ते आपल्याला सांगत आहेत श्रीमंत दगडूशेठ गणपती आपल्या घरी कसा अवतरणार, आपण त्याची आरती कशी करू शकणार. होय प्रशांत दामले यांची फेसबुक, इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.

काय म्हटलं आहे प्रशांत दामले यांनी व्हीडिओत? ते नेमकं काय सांगत आहेत?

गणपती बाप्पाचं आपल्या आयुष्यातलं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी आणि यावर्षी आपल्याला सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेताच आलेलं नाही. त्यामुळे जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटतं नाही का? पण समजा मी असं म्हटलं की दगडूशेठ गणपती बाप्पाला मी तुमच्या घरात आणणार आहे.. असं समजा म्हटलं तर तुम्हाला केवढा आनंद होईल! चला तर.. प्रत्यक्षात गणपती बाप्पाला घरात कसं आणायचं ते मी तुम्हाला दाखवतो

गणपती बाप्पाला आता प्रत्यक्ष आपल्याला घरात आणायचं आहे, त्यासाठी www.DagdushethGanpati.net ही लिंक क्लिक करा. ही लिंक ओपन झाल्यानंतर प्ले आरती लिहिलं आहे. मग आरती सुरू झाली आहे. त्यानंतर उजवीकडे एक बटण आहे तिथे क्लिक करा मग कॅमेरा सुरू होईल आणि मग दगडूशेठ गणपती प्रत्यक्ष तुमच्या घरात अवतरलेला दिसेल. आता प्रत्यक्ष आरती करायची आहे. घरातल्या सगळ्यांना बोलवा आरतीसाठी त्यासाठी कॅमेराचा अँगल तुम्हाला सेट करायचा आहे. अँगल लावलात की छानपैकी मस्तपैकी फोटो काढता येईल. कॅमेराचं बटण लाँग प्रेस केलंत की व्हीडिओही काढता येईल. आरतीचा व्हीडिओ, फोटो शेअर करायला विसरायचं नाही हाँ..

प्रशांत दामले यांनी शेअर केलेली लिंक

गणेश उत्सव घराघरात उत्साहाने साजरा होतो आहे. मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच हे वर्षही कोरोनाचं असल्याने उत्सव साधेपणाने साजरा केला जातो आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर काही बंधनं आहेतच त्यामुळे घरच्या घरी जर दगडूशेठ गणपतीची आरती करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे सगळं प्रशांत दामले यांनी या व्हीडिओत समजावून सांगितलं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हीडिओ चांगलाच व्हायरलही होतो आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in